Home | Business | Share Market | rbi may increase the intrest rate in june

जून महिन्यात व्याज दरवाढ : नोमुरा

वृत्तसंस्था | Update - Apr 22, 2017, 03:00 AM IST

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पुढील आढावा बैठकीत व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. पतधोरणाचा आढावा घेणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सहा एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचे मिनिट्स गुरुवारी जारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने जारी करण्यात आले.

 • rbi may increase the intrest rate in june
  नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पुढील आढावा बैठकीत व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. पतधोरणाचा आढावा घेणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सहा एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचे मिनिट्स गुरुवारी जारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने जारी करण्यात आले.
  यानुसार पुढील काळात महागाई दरात वाढ होणार असल्याच्या मतावर सर्व सदस्य सहमत झाले होते. त्यामुळे या मिनिट्सच्या आधारावर जपानी आर्थिक सेवा देणारी संस्था नोमुराने हा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेची पुढील आढावा बैठक पाच आणि सहा जून दरम्यान होणार आहे.
  एमपीसीच्या सर्व सदस्यांनी प्रमुख महागाई दरात वाढ आणि नोटाबंदीच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली असल्याचे नोमुराने आपल्या अभ्यास अहवालात नमूद केले आहे. एकूण सहा सदस्यांपैकी दोन सदस्यांनी व्याज दरवाढीचे संकेत दिले आहेत. खाद्यपदार्थांच्या महागाई दरात पुन्हा वाढ होणार असून समितीच्या या मताशी आम्हीही सहमत असल्याने नोमुराने म्हटले आहे.
  भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहासदस्यीय एमसीपीने सहा एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्य रेपो दरात (६.२५ टक्के)
  कोणताच बदल केला नव्हता. रिझर्व्ह बँक ज्या व्याज दरावर बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर म्हटले जाते. तर याच बैठकीत रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात वाढ करत ५.२५ टक्क्यांवरून ६ टक्के केला होता.

Trending