Home | Business | Share Market | read how One blanket made him crorepati

तुमच्याकडे आहे जुने ब्लॅंकेट, होऊ शकता मालामाल, करा हा उपाय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 23, 2017, 03:34 PM IST

नवी दिल्ली- फिल्म हेराफेरीचे हे गाणे तुम्हाला माहिती असेल. देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के.

 • read how One blanket made him crorepati

  नवी दिल्ली- फिल्म हेराफेरीचे हे गाणे तुम्हाला माहिती असेल. देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के. काहीशी अशीच आहे या व्यक्तीची सक्सेस स्टोरी. कधी १३ हजार रुपयांमध्ये महिना काढणाऱ्या या व्यक्तीला एका ब्लॅंकेटने कोट्यधीश केले आहे. आता तो अत्यंत लक्झरिअस आयुष्य व्यतित करतोय. जाणून घ्या या व्यक्तीबाबत.

  १३ हजार रुपयांत काढायचा महिना
  अमेरिकेचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव आहे लॉरेन क्राइटजर. लॉरेनने सांगितले आहे, की एखादी व्यक्ती गरीबीची श्रीमंत कशी झाली ही स्टोरी ऐकायला खुप चांगली वाटते. मी पण २०० डॉलरवर (१३ हजार रुपये) महिना काढायचो. पण मला कुटुंबाकडून मिळालेल्या एका ब्लॅंकेटने माझे नशिब बदलले. मी चक्क श्रीमंत झालो. आज माझ्याकडे बंगला, पॉश गाडीसह ऐशोआरामाच्या सगळ्या गोष्टी आहेत.

  पुढील स्लाईडवर वाचा, एका ब्लॅंकेटने या व्यक्तीला कसे केले श्रीमंत...

 • read how One blanket made him crorepati

  १० कोटींना विकले गेले ब्लॅंकेट
  २००७ मध्ये लॉरेन एका कार अपघातात जखमी झाले. अपघात झाल्याने बेडवर पडून ते टीव्ही बघत होते. त्यावर एक अॅंटिक रोडशो प्रोग्राम आला होता. त्यांनी बघितला की यावर एक ब्लॅंकेट विकले जात आहे. त्यांच्याकडेही अगदी जसेच्या जसे ब्लॅकेट होते. त्यांनी टीव्ही पॉझ केला. घरातून आलमारीतून ब्लॅंकेट बाहेर काढले. टीव्हीवरच्या ब्लॅकेटशी मॅच करुन बघितले. त्यानंतर त्यांनी एक ऑक्शन हाऊसला फोन केला. हे ब्लॅंकेट चक्क १० कोटी रुपयांना विकले गेले.

 • read how One blanket made him crorepati

  २०० वर्षे जून होते ब्लॅंकेट
  लॉरेन यांना कुटुंबाकडून हे ब्लॅंकेट मिळाले होते. आजीचे निधन झाल्यावर सामान गोळा करण्यासाठी ते पिढीजात घरी गेले होते. तेव्हा त्यांना एका थैलीत दोन ब्लॅंकेट आढळून आले होते. त्यांनी ते ब्लॅंकेट घरी आणले. पण त्यांचा कधी वापर केला नाही.

 • read how One blanket made him crorepati

  स्टॉक्समध्ये केली गुंतवणूक
  लॉरेन यांनी आलेल्या पैशांमधून दोन घरे खरेदी केली. त्यानंतर राहिलेली रक्कम स्टॉक्समध्ये गुंतवली. एक लग्झरी कार विकत घेतली. आता बऱ्याच पर्यटन स्थळांना भेट देत आहे.

   

  जुने असल्याने विकले गेले ब्लॅंकेट महाग

  लॉरेन यांच्याकडे असलेले ब्लॅंकेट अत्यंत जुने होते. अशा प्रकारचे मोजकेट ब्लॅंकेट सध्या जगात आहेत. त्यामुळे ते मोठ्या रकमेला विकले गेले

Trending