आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीला ब्रेक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजाराला तारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - युरोपीय बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ०.७० टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १७२ अंकांनी वाढून २४,८५४ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक ५२ अंकांनी वाढून ७५६२ च्या पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारात बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात बँक निफ्टी, ऑटो आणि पॉवर स्टाॅक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. वास्तविक इन्फ्रा आणि रिअल्टी इंडेक्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली. दिवसभराच्या व्यवहारात रिलायन्स उद्योगसमूहाचा स्टॉक्स बाजारात सर्वात जास्त वाढला. व्यवहाराच्या दरम्यान हा स्टॉक्स १८ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर १०८० रुपयांच्या वर पोहोचला.

निफ्टीमधील ५० पैकी २६ स्टॉक्समध्ये वाढ
राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० स्टॉक्सपैकी २६ स्टॉक्समध्ये खरेदी झाल्याची नाेंद झाली दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचसीएल टेक आणि टाटा मोटर्स निफ्टीच्या सर्वोच्च पाच स्टॉक्समध्ये राहिले. या सर्वांमध्ये दोन ते तीन टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली, तर वेदांता लिमिटेड, आयडिया, अदानी पोर्ट््स, एल अँड टी आणि भारती एअरटेलमध्ये देान टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली.

युरोपातील तेजीचा परिणाम
कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली रिकव्हरी आणि अमेरिकेतील बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे युरोपीय बाजारात तेजी आली. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीचे प्रमुख निर्देशांक एक ते दीड टक्क्यांपर्यंत वाढले. याचा परिणाम देशातील बाजारावर दिसून आला. चीनमधील बाजार शेवटच्या अर्ध्या तासात घसरले असून तेथील निर्देशांक शांघाय २.४ टक्क्यांच्या घसरणीसह २९५० च्या पातळीवर बंद झाला, तर इतर आशियाई बाजारांतील निर्देशांक अर्धा ते तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

तीन आठवड्यांनंतर तेजी
चीनच्या अर्थव्यवस्थेमुळे आधीच चिंतित असलेल्या बाजाराला बुधवारच्या सत्राने सावरले. तीन आठवड्यांनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या निशाणाच्या वर बंद होण्यास यशस्वी झाले. गेल्या नऊ सत्रांपैकी आठ सत्रांमध्ये घसरण दिसून आली होती.

बँक निर्देशांकात तेजी
राष्ट्रीय शेअर बाजारात बँक, ऑटो आणि एनर्जी निर्देशांकात जोरदार तेजी दिसून आली. बँक ०.७५ टक्के, ऑटो निर्देशांक ०.८५ टक्के आणि एनर्जी निर्देशांक १.३२ टक्क्यांच्या तेजीसह दिवसभरातील सर्वोच्च पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाले, तर इन्फ्रा आणि मेटल निर्देशांक एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले.
बातम्या आणखी आहेत...