आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीकली इकॉनॉमी: एनपीएसमध्ये गुंतवणूक करणेच योग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीए सरकारने२००९ मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (नॅशनल पेन्शन स्कीम, एनपीएस) सुरू केली होती. ही सर्वांसाठी होती. या योजनेत कमीत कमी सहा हजार रुपये वार्षिक गुंतवणूक, वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत योजनेत सहभागी हाेता येत होते, प्राप्तिकर विभागाच्या कायद्यानुसार वार्षिक ५०,००० रुपयांपर्यंत "कलम ८० सी'चा लाभ, योजना व्यवस्थापनासाठी कमी शुल्क आणि जमा रकमेवर कमीत कमी ४० टक्के एन्युटी किंवा निवृत्ती फंडात गुंतवणूक. जर आपण उर्वरित ६० टक्के रक्कम काढली तर त्या वर्षी ते अापले उत्पन्न समजून त्यावर कर भरावा लागेल. वार्षिक मिळणाऱ्या पैशावरही कर लागेल.

गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पैसे काढल्यावर लागणारा कर कमी केला आहे. एक एप्रिल २०१६ पासून आपण मॅच्युरिटी (६० वर्षे वय) वर ६० टक्के रक्कम काढली तर ४० टक्क्यांवर कर लागणार नाही. उर्वरित २० टक्के रक्कम आपल्या उत्पन्नात जोडली जाईल. एन्युटी वरील ४० टक्के रकमेच्या प्रस्तावात काहीच बदल करण्यात आलेला नाही. या बदलानंतर एनपीएस चांगली योजना राहिली आहे का?

याचे उत्तर "नाही' असेच आहे. कराच्या दृष्टीने ही पहिल्यापेक्षा चांगली योजना झाली आहे. मात्र, इतर अनेक योजनांशी तुलना केल्यास तसे दिसत नाही. जर आपण स्वत:चा पैसा गुंतवत असू तर आपल्याला करात किती सूट मिळेल. "इक्विटी लिन्क्ड सेव्हिंग्ज स्कीम' (ईएलएसएस) किंवा बँकांचे इतर कर वाचवणाऱ्या एफडीसारख्या योजनांवर आपल्याला ८० टक्के फायदा मिळतो. इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास आणि एक वर्षानंतर पैसे काढल्यास त्यावर कर लागत नाही. "डेट म्युच्युअल फंड' किंवा बाँडमध्ये पैसे लावल्यास आपल्याला "कॉस्ट इन्फ्लेशन' निर्देशांकाचेही फायदे मिळतात. इंडेक्सेशननंतर जो परतावा मिळेल त्यावरच कर लागेल. सध्याच्या स्थितीत डेट फंडावर आठ ते नऊ टक्के परतावा मिळत आहे. या दृष्टीने पाहिल्यास अत्यंत कमी कर लागेल. सरकारी कंपन्यांच्या करमुक्त रोख्यांत पैसे गुंतवल्यास व्याजावर कर लागणार नाही, तर तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी पैसे गुंतवल्यास "कॉस्ट इंडेक्सेशनचाही फायदा मिळतो.

आता एनपीएस आणि खासगी गुंतवणुकीची तुलना करूया. समजा वयाच्या ५५ व्या वर्षी आपण एनपीएसमध्ये ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. तर पाच वर्षांनंतर आपल्याला ५० लाख रुपये मिळतील. यातील २० लाख रुपये एन्युटीमध्ये जातील. यावर परतावा सात टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यावर कर वेगळा लागेल. कर भरल्यानंतर वास्तविक परतावा टक्क्यांपेक्षा कमी असेल. उर्वरित तीस लाख रुपयांतून १० लाख आपल्या त्या वर्षीच्या उत्पन्नात जोडले जाईल. जर आपण ३० टक्के कराअंतर्गत असाल तर तीन लाख रुपये कर भरण्यात जातील. उर्वरित २० लाखांचा आपल्याला हवा तसा वापर करता येईल. आता समजा तेच ४० लाख रुपये आपण एनपीएसमध्ये गुंतवता स्वत: गुंतवणूक केली. यातील २० लाख इक्विटी आणि २० लाख डेट फंडमध्ये गुंतवले. समजा दोन्ही गुंतवणुकीवर पाच वर्षांनंतर २५ -२५ लाख परतावा मिळाला. म्हणजे एकूण ५० लाख रुपये, एनपीएसच्या बरोबरीत. यात इक्विटीच्या पाच लाख परताव्यावर कोणताच कर लागणार नाही. महागाई दर वर्षाकाठी पाच टक्के धरला तर डेट फंडातील पाच लाख रुपयांवरदेखील कर भरावा लागणार नाही. इतकेच नाही मॅच्युरिटीवर मिळणारी पूर्ण रक्कम आपण बँक एफडी (७.५ टक्के परताव्यावर कर), कर-मुक्त रोख्यावर (६.५-६.८ टक्के परतावा), सरकारी रोखे (आठ टक्के परताव्यावर कर) किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (८.६ टक्के परताव्यावर कर) लावू शकतात.

तसेच आपले नशीब चांगले असल्यास इक्विटीमध्ये गुंतवणुकीवर आपल्याला जास्त परतावादेखील मिळू शकतो. दुसरीकडे एन्युटी किंवा निवृत्तिवेतन योजनेत आपल्याला सात टक्क्यांपेक्षा कमी परतावा मिळेल. आणि जर आपण ६० टक्के रक्कम काढली तर २० टक्के कर भरावा लागेल. त्यामुळे एनपीएसमध्ये गुंतवणूक केलेलीच बरी.
(rjagannathan@dbcorp.in)
(लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.)