नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत गुरुवारी गेल्या 20 महिन्यातील निचांकी पातळीवर गेली आहे. बाजारात झालेल्या चौफेर विक्रीच्या माऱ्या मुळे रुपया 64 अंकावर गेला. अशी परिस्थिती 13 सप्टेंबर 2013 मध्ये निर्माण झाली होती. रुपयाच्या अवमुल्यनामुळे अन्न-धान्यासह अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. भारतात गरजेच्या 80 टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात केले जाते. रुपयाची घसरणीमुळे आयाम महाग होईल आणि त्यामुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक महागाई वाढू शकते. दरम्यान, शेअर बाजारातही आज घसरण पाहायला मिळाली. 17 डिसेंबर 2014 नंतर आज (गुरुवार) प्रथमच निफ्टीचा निर्देशांक 8000 अंका खाली गेला. मात्र नंतर त्याने परत 8000 ची पातळी गाठली.
आर्थिक आघाडीवरील अपयश सर्वात मोठे कारण
गुरुवारी सकाळी रुपया 24 पैशांनी मागे होता. 63.78 वर बाजार उघडला आणि रुपयाच्या घसरणीला सुरुवात झाली. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया 64.15 वर आहे. बुधवारी त्याचा दर 63.54 रुपये प्रती डॉलर होता. तज्ज्ञांच्या मते आर्थिक आघाडीवर सरकारचे अपयश हे रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर लावण्यात आलेला किमान पर्यायी कर आणि त्यातून निर्माण झालेली संभ्रमावस्था, मार्चच्या तिमाहीतील कंपन्यांचे निराशाजनक आर्थिक निकाल यांचा हा परिणाम आहे. विदेशी गुंतवणूकदार चीन आणि सिंगापूरकडे वळत आहे. त्यामुळे ही घसरण असल्याचे मानले जाते. एका अहवालानुसार, रुपया 69 पर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते रुपयाच्या घसरणीची कारणे
- ‘मॅट’ कराबद्दल वित्तमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन त्याबाबतची संभ्रमावस्था कायम.
- रुपयाची किंमत ओव्हरव्हॅल्यू झाली होती, त्यात आता सुधारणा होत आहे
- ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या दरात तेजी.
- निर्यातीच्या आघाडीवर पिछाडी, उलट आयात वाढली.
- उत्पादन क्षेत्रातील घसरण