आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरच्या तुलनेत रुपया पैसे मजबूत; ६८.५८ च्या पातळीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत मंगळवारी रुपया पैशांनी मजबूत होऊन ६८.५८ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहाराच्या सुरुवातीला रुपया घसरणीसह ६८.६५ च्या पातळीवर उघडला. व्यवहारासोबत रुपयामध्ये आलेली घसरण आणि वाढ यामुळे रुपया ६८.७० च्या पातळीवर आला. वास्तविक, बँक आणि निर्यातदारांच्या वतीने डॉलरची विक्री वाढल्यामुळे रुपयाला आधार मिळाला आणि व्यवहाराच्या शेवटी तीन पैशांच्या वाढीसह बंद झाला, तर दुसरीकडे जगभरातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरच्या निर्देशांकात ०.०१ टक्क्याची किरकोळ वाढ झाली. सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ३० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता.

डॉलरची तुलना केल्यास अजूनही रुपया सात ते आठ टक्के महाग असल्याचे मत आयएफए ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गोयंका यांनी व्यक्त केले आहे. अशा स्थितीत रुपयामध्ये आणखी घसरण दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.