आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई वाढणार; चीनी \'युआन\'च्या डीव्हॅल्युएशनमुळे रुपयाचे अवमुल्यन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीनच्या सेंट्रल बॅंकेने 'युआन'चे दोन टक्क्याने मुल्य कमी केली आहे. त्याचा भारतीय रुपयावर प्रतिकुल परिणाम दिसत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत तब्बल दोन वर्षांनंतर (सप्टेंबर 2013 नंतर) निचांकी पातळीवर घसरला.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत बुधवारी 36 पैशांनी खाली कोसळत 64.55 वर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या चढ-उताराचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे. महागाई आणखी वाढण्याची शक्यता विशेषज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मंगलवारी पहिल्या सत्रात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 64.19 वर आली होती. तर सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 63.87 वर बंद झाला होता. यापूर्वी 28 ऑगस्त 2013 ला डॉलरच्या तुलनेत रुपया 68.80 वर सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता.

अन्न-धान्यासह अनेक वस्तू महागण्याची शक्यता
रुपयाच्या अवमुल्यनामुळे अन्न-धान्यासह अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. भारतात गरजेच्या 80 टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात केले जाते. रुपयाची घसरणीमुळे आयात महाग होईल आणि त्यामुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक महागाई वाढू शकते.
तज्ज्ञांच्या मते आर्थिक आघाडीवर सरकारचे अपयश हे रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांवर लावण्यात आलेला किमान पर्यायी कर आणि त्यातून निर्माण झालेली संभ्रमावस्था, मार्चच्या तिमाहीतील कंपन्यांचे निराशाजनक आर्थिक निकाल यांचा हा परिणाम आहे. विदेशी गुंतवणूकदार चीन आणि सिंगापूरकडे वळत आहे. त्यामुळे ही घसरण असल्याचे मानले जाते. एका अहवालानुसार, रुपया 69 पर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तज्ज्ञांच्या मते रुपयाच्या घसरणीची कारणे