आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वाढीसह निफ्टी ८६०९ वर बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला नाही. सुरुवातीला बाजारात जोरदार खरेदी झाली, मात्र बँकिंग शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे बाजार कोसळला. शेवटच्या सत्रात झालेल्या खरेदीमुळे निफ्टी ८६०० च्या वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने २८५७६.३२ च्या वरची पातळी गाठली होती, तर निफ्टी ८६४२.९५ पर्यंत पाेहोचला हेाता. शेवटच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १७ अंकाच्या छोट्याशा वाढीसह २८४६३ च्या, तर निफ्टी २ अंकांच्या वाढीसह ८६०९ च्या पातळीवर बंद झाला.
दिवसभराच्या व्यवहारात मोठे शेअर विशेष कामगिरी करू शकले नसले तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरच्या बाबतीत खरेदीमध्ये उत्साह दिसून अाला. मिडकॅप इंडेक्स ०.३ टक्क्यांच्या वाढीसह १३७२० च्या पातळीवर बंद झाला, तर मुंबई शेअर बाजारातील स्मॉलकॅप इंडेक्स ०.५ टक्क्यांच्या मजबुतीसह ११७१६ च्या पातळीवर बंद झाला. रिअॅल्टी, मेटल, बँकिंग आणि तेल व वायू या क्षेत्रांतील समभागांच्या विक्रीमुळे बाजारात दबाव दिसून आला. बँक निफ्टीदेखील ०.३ टक्के पडून १९१०६ च्या पातळीवर बंद झाला.
बाजार सकारात्मक
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत आहेत. गुंतवणूकदारांच्या सर्व शंकादेखील दूर होत असल्याचे मायस्टॉक रिसर्चचे प्रमुख लोकेश उप्पल यांनी सांगितले. इराण करार आणि ग्रीसला मिळालेल्या मदतीमुळेदेखील बाजारात स्थिरता आहे. एफआयआयची सकारात्मक बातमी असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...