आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रेग्झिट'शी सामना करण्यास रिझर्व्ह बँक, सेबी तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुरुवारी ब्रिटनमध्ये "ब्रेग्झिट' जनमत चाचणी होणार असून या घटनाक्रमावर सूक्ष्म नजर असल्याचे रिझर्व्ह बँकेने बुधवारी सांगितले. या निर्णयाचा वित्तीय बाजारावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून आवश्यकता भासल्यास निधीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आरबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत.

बाजार नियामक सेबीचे बाजारावरील नियंत्रण मजबूत असल्याचा दावा सेबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क व्यवस्थितपणे काम करत आहे. ब्रेग्झिट जनमत चाचणीनंतर होणाऱ्या विपरीत परिणामांशी दोन हात करण्यासाठी यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ब्रिटनने युरोपीय संघासोबत (२८ देशांचा संघ) राहावे की बाहेर पडावे याचा निर्णय घेण्यासाठी २३ जूनला देशातील जनता मतदान करणार आहे. या जनमत चाचणीला ब्रेग्झिट रेफरेंडम असे नाव देण्यात आले आहे. जर ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला तर आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारावर याचा विपरीत प्रभाव पडणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेनेट येलन यांनीही याला दुजोरा दिला होता.

व्यवसायाच्या दृष्टीने भारत हा ब्रिटनसह युरोपीय संघासोबतचा महत्त्वाचा भागीदार आहे. जनमत चाचणीचा निकाल काय लागेल यावरून भारतासह जगभरातील बाजारावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.
बातम्या आणखी आहेत...