आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"लॉक-इन पीरियड' ६ महिन्यांवर : सेबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भांडवली बाजार नियंत्रक "सेबी'ने प्रारंभ करणार्‍या कंपन्यांना बाजारातून निधी जमा करण्याची मंजुरी दिली आहे. मंगळवारी सेबीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नव्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

सेबीच्या वतीने स्टार्टअप कंपन्यांना बाजारातून पैसे उचलण्यास मंजुरी देण्यात आली असून आता १ जानेवारी २०१६ पासून या कंपन्या बाजारातून पैसे उचलू शकतात. यासाठी सेबीच्या वतीने लॉक-इन पीरियड ३ वर्षांवरून ६ महिने करण्यात आला आहे. या निर्णयानंतर स्टार्टअप कंपन्या विदेशी गुंतवणूकदारांऐवजी येथील बाजारातून आवश्यक पैसा गोळा करू शकतील. याबरोबरच या कंपन्यांसाठी नवीन ट्रेडिंग सुविधा देण्याची घोषणादेखील सेबीने केली आहे.

१० लाख रुपयांची गुंतवणूक : या कंपन्यांसाठी कमीत कमी गुंतवणुकीची सीमा १० लाख रुपये असणार आहे. नव्या कंपन्यांसाठी सेबीने कंपनीच्या प्रकटीकरण नियमातदेखील दिलासा दिला आहे. सेबीच्या मते टेक्नाॅलॉजी स्टार्टअप कंपन्यांकडे एकूण गुंतवणुकीच्या २५ टक्के, तर नॉन टेक्नॉलॉजी कंपन्यांकडे ५० टक्के रक्कम असली पाहिजे. हा निर्णय कंपन्यांच्या फायद्याचा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...