आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स सात महिन्यांनी २७ हजारांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पतधोरणात महागाई वाढणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे तसेच बँकिंग क्षेत्रात झालेल्या जोरदार खरेदीमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार सात महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २३२ अंकांच्या वाढीसह २७,००९ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ६५ अंकांच्या वाढीसह ८२६६ च्या पातळीवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० पैकी ३९ स्टॉक्समध्ये खरेदी नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये समावेश असलेल्या स्टॉक्समध्ये एसबीआय, अायसीआयसीआय बँक, येस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिंदाल्कोमध्ये सर्वात जास्त वाढ नोंदवण्यात आली. या सर्व स्टॉक्समध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली, तर बीपीसीएल, इंड्सइंड बँक, अरबिंदो फार्मा, टाटा पॉवर, आयशर मोटर्समध्ये १ ते २ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली.

राष्ट्रीय शेअर बाजारातील जवळपास सर्वेच क्षेत्रातील निर्देशांक हिरव्या निशाणावर व्यवहार करत आहेत. बँक, ऑटो, एफएमसीजीमध्ये मंगळवारच्या व्यवहारात एक टक्क्यापेक्षा जास्तची वाढ दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा निर्देशांक ४.२७ टक्क्यांच्या वाढीसह २५३४ च्या पातळीवर बंद झाले.

अपेक्षेप्रमाणेच निर्णय
पतधोरण आढावा बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेला निर्णय अपेक्षेप्रमाणेच असल्याचे मत मायस्टॉक रिसर्चचे प्रमुख लोकेश उप्पल यांनी व्यक्त केले. या बैठकीतून बाजाराला जास्त अपेक्षाच नव्हत्या. पुढील २ ते ३ महिने बाजार सकारात्मक राहणार असून मान्सून चांगला राहिल्यास बाजारातील सकारात्मकता आणखी वाढण्याची शक्यता उप्पल यांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...