आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 53, तर निफ्टी 15 अंकांनी वधारला, सर्वात जास्त तेजी बँकिंग क्षेत्रात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक पातळीवरून मिळालेल्या मजबूत संकेतामुळे भारतीय बाजारात मजबुती दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ५३ अंकाच्या वाढीसह २६७४७ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १५ अंकाच्या वाढीसह ८२६१ अंकाच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ०.२० टक्के तर निफ्टीमध्ये ०.१८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक तेजी दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजारातील ११ इंडेक्समधील ८ इंडेक्स हिरव्या निशाणीवर बंद झाले. फक्त ऑटो, मेटल आणि फार्मा इंडेक्समध्येच घट नोंदवण्यात आली आहे.
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सर्वात जास्त तेजी बँकिंग क्षेत्रात नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात २.४५ टक्के तर खासगी क्षेत्रातील बँकिंग निर्देशांकात ०.८३ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...