आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची धास्ती, सेन्सेक्स ५५१ अंकांची गटांगळी खात नीचांकी पातळीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीन शेअर बाजारातील माेठी पडझड अाणि त्यातच पार्टिसिपेटरी नाेट्ससाठी कडक नियम अाणण्याच्या संकेतांमुळे बाजाराच्या पायाखालची वाळू सरकली. या भीतीतून बाजारात तुफान विक्रीचा मारा हाेऊन सेन्सेक्स ५५१ अंकांची गटांगळी खात २७,५६१.३८ अंकांच्या पाच अाठवड्यांच्या नीचांकी पातळीवर अाला.

विशेष तपास पथकाने दिलेल्या अहवालानंतर भांडवल बाजार नियंत्रक पी-नाेट्सच्या लाभार्थी मालकांना शाेेधून काढण्यासाठी अाणखी उपाययाेजना करणार अाणि त्यांच्या हस्तांतरणावर निर्बंध अाणण्यासाठी कडक नियमावली अाणण्याच्या वृत्तामुळे बाजार हादरला. गुंतवणुकीवर परिणाम हाेण्याच्या भीतीतून बाजाराने नफारूपी विक्रीचा सपाटा लावला. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी विदेशातील गुंतवणूकदारांमध्ये पार्टिसिपेटरी नाेट्स हे सगळ्यात पसंतीचे माध्यम अाहे. त्यामुळे अाता पुढे काय हाेणार याची बाजाराला जास्त चिंता लागली. सरकारच्या पुनरुज्जीवन देण्याच्या प्रयत्नांनंतरही चीनमधील अाैद्याेगिक क्षेत्राची कामगिरी खराब झाल्यामुळे अाशियाई शेअर बाजारातदेखील विक्रीचा मारा झाला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे बाजारात विक्रीचा जाेर अाणखी वाढला.

बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात टाटा स्टीलला सर्वात माेठा फटका बसला. त्यापाठाेपाठ हीराे माेटाेकाॅर्पचा समभाग घसरला. केवळ बजाज अाॅटाेचे समभाग या घसरणीमध्ये कसेबसे तरले. धातू, भांडवली वस्तू, बँक, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, वाहन, तेल अाणि वायू तसेच माहिती तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांची पडझड झाली.

जून महिन्यात चीनमधील अाैद्याेगिक उत्पादनाची कामगिरी थंडावल्यामुळे चीन शेअर बाजारात माेठी घसरण झाली. त्याचा बाजारावर माेठा परिणाम झाल्याचे मत बाेनान्झा पाेर्टफाेलिअाेचे सहायक निधी व्यवस्थापक हिरेन धकान यांनी व्यक्त केले. जागतिक शेअर बाजारांमध्ये हाँगकाँग अाणि जपान शेअर बाजार खालच्या पातळीवर बंद झाले. अमेरिकेमध्ये ‘सिंगल फॅमिली’ घरांच्या विक्रीत घट झाल्याच्या वृत्तामुळे येथे शेअर बाजारातदेखील पडझड झाली.

२ जूननंतरची माेठी घसरण
विक्रीच्या तुफान मा-यामध्ये सेन्सेक्सने २८ हजार अंकांची महत्त्वाची पातळी माेडली अाणि दिवसअखेर ताे ५५०.९३ अंकांनी घसरून २७,५६१.३८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दाेन जूननंतर बाजारात झालेली ही माेठी घसरण अाहे. राष्ट्रीय शेअर बाजारातदेखील निफ्टी ८,४०० अंकांच्या पातळीवरून खाली गेला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीमध्ये १६०.५५ अंकांची घरण हाेऊन ताे ८३६१ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

पी-नाेट्ससंदर्भात कडक नियम
पी-नाेट्ससंदर्भात कडक नियम करण्याच्या शक्यतेमुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरले हाेते. त्यामुळेही विक्रीचा मारा वाढला. सर्वाेच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने केलेल्या शिफारशींसंदर्भात सर्व भागधारकांबराेबर सरकार सल्लामसलत करेल अाणि या प्रकरणात लक्ष घालेल, असे अाश्वासन वित्तमंत्री अरुण जेटली अाणि महसूल सचिव शक्तिकांता दास यांनी दिल्यामुळे बाजाराला थाेडाफार दिलासा मिळाला. देशातल्या गुंतवणुकीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम हाेईल, अशी काेणतीही पावले उचलली जाणार नाहीत, अशी खात्रीही वित्तमंत्र्यांनी दिली.