आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीचांकावरून सेन्सेक्स, निफ्टीची तेजीने उसळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंपन्यांच्या िनराशाजनक अार्थिक कामगिरीमुळे िनराश झालेल्या गुंतवणूकदारांना अायसीअायसीअाय बँक, मारुती सुझुकी यांनी सुखद धक्का िदला. या कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगला नफा कमावल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह वाढून सेन्सेक्सने २१९ अंकांनी उसळी घेऊन गेल्या तीन सत्रांमधील ताेटा भरून काढला.

सर्वाधिक वाढ अाणि िस्थरता या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेने मजबूत पकड घेतली अाहे. त्यातच तेलाच्या अाणि जिनसांच्या िकमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे त्याचाही एक माेठा अाधार िमळाला असल्याचे जागतिक बँकेने म्हटले अाहे. अार्थिक वाढीला गती िमळाली असून महागाई घसरली अाहे.

चालू खात्यातील तूटही िनयंत्रणात अाली अाहे. या सगळ्या गाेष्टी लक्षात घेतल्यास यंदाच्या अार्थिक वर्षात साडेसात टक्के विकास दर गाठणे शक्य हाेऊ शकेल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला अाहे. दुसऱ्या बाजूला रुपयादेखील डाॅलरच्या तुलनेत ६३.१२ रुपये असा बळकट झाल्यामुळे बाजारातील खरेदीचा उत्साह अाणखी वाढला.

गेल्या तीन िदवसांच्या पडझडीनंतर सेन्सेक्स २७,२१५.६१ अंकांच्या भक्कम पातळीवर उघडला अाणि खरेदीच्या पाठबळामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने २७,३६५.७२ अंकांची अाणखी वरची पातळी गाठली. परंतु नंतर थाेड्या फार प्रमाणात झालेल्या नफरूपी विक्रीनंतर सेन्सेक्स २७,०७३.२५ अंकांच्या खालच्या पातळीवर अाला हाेता. परंतु मारुती सुझुकी, अायसीअायसीअाय बँक यांच्या चाैथ्या ितमाहीतील अार्थिक कामगिरीमुळे बाजाराला िदलासा िमळाला. त्यामुळे अखेरच्या तासात पुन्हा जाेरदार खरेदी हाेऊन सेन्सेक्स २१९.३९ अंकांची उसळी घेत २७,४८२.१४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांक ७१.८० अंकांनी वाढून ८२८५.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. अाशियाई शेअर बाजारातील संिमश्र वातावरण
अाणि युराेप शेअर बाजारात नरमाईचे वातावरण हाेते.

टाॅप गेनर्स
टाटा माेटर्स, भेल, भारती एअरटेल, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, हीराे माेटाेकाॅर्प, एचडीएफसी, हिंदाल्काे, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील.

टाॅप लुझर्स
अायटीसी, इन्फाेसिस, काेल इंिडया, गेल, बजाज अाॅटाे, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी.
बातम्या आणखी आहेत...