आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sensex Back In Red Despite Late Recovery, Ends 97 Points Down

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात ९७ अंकांनी गडगडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक बाजारातील नरमाई अाणि त्यातच चीनच्या महागाईमध्ये मागील वर्षाच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढ, किंमतघटीची चिंता या सगळ्या कारणांमुळे दिवसभर बाजारात घसरणीचा कल राहिला. कामकाजाच्या शेवटच्या टप्प्यात खरेदीची साथ मिळूनही त्याचा फारसा उपयाेग झाला नाही अाणि सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात ९७ अंकांनी गडगडला.

जुलैमधील अाैद्याेगिक उत्पादनाची तसेच अाॅगस्टमधील महागाईची अाकडेवारी जाहीर हाेणार असल्याने बाजारात सावध व्यवहार झाले; परंतु सरकारने बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर जीएसटी विधेयकाला मंजुरी देण्यासाठी हिवाळी अधिवेशन बाेलावण्यात येईल, असे सरकारने म्हटल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह वाढला पण ताे अाैट घटकेचा ठरला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५,५२२.९८ अंकांच्या पातळीवर उघडला अाणि नंतर काही बड्या समभागांच्या विक्रीमुळे ताे सातत्याने घसरत २५,२८७.५० अंकांच्या पातळीवर अाला. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये थाेडीफार सुधारणा झाली. त्यामुळे थाेडासा लगाम बसून सेन्सेक्स ९७.४१ अंकांनी घसरून २५,६२२.१७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दाेन सत्रांत सेन्सेक्समध्ये ८२५.७७ अंकांनी घसरगुंडी झाली अाहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ७,७०० अंकांच्या पातळी खाली म्हणजे ७६७८.५० अंकांच्या पातळीवर अाला. दिवसअखेर निफ्टी ३०.५० अंकांनी घसरून ७७८८.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला. अाशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाईचे वातावरण हाेते. सकाळच्या सत्रात युराेप शेअर बाजारही जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे घसरला हाेता.