आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंबई - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजारामध्ये चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स १५० अंकांनी तर निफ्टी ३७ अंकांनी वाढून बंद झाला. देशातील बाजारांमध्ये दमदार संकेत मिळत असल्यामुळेच शेअर बाजारामध्ये तेजीची नोंद झाली आहे. वास्तविक पाहता एशियामध्ये घसरण सुरू असल्यामुळे बाजारात सुरुवातीला मंद गती दिसून आली होती. शेवटी मुंबई शेअर बाजारातील प्रमुख ३० शेअरचा मुख्य सेन्सेक्स निर्देशांक १५० अंकांनी वाढून २७,३६४.९४ वर बंद झाला. तर एनएसईचा प्रमुख ५० शेअरचा निफ्टी ३७ अंकांनी वाढून ८२७५ वर बंद झाला. सोमवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅपसह रियल्टी आणि फार्मा शेअरमध्ये खरेदारी झाली.