आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरेदीचा जोर वाढला, सेन्सेक्स ३५० ने वाढला, निफ्टीत 1.5 टक्के वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात खरेदी वाढल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दिवसभर वाढ दिसून आली. स्थानिक पातळीवर खरेदी झाल्याने बाजारात सकारात्मकता दिसली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याबरोबरच व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने बँक आणि ऑटो शेअरला पसंती मिळाली. शुक्रवारी निफ्टी ८४०० पातळीपर्यंत गेला होता, तर सेन्सेक्सनेदेखील ३०० अंकांची वाढ मिळवली. सेन्सेक्स अाणि निफ्टी १.२५ टक्के वाढीसह बंद झाला.

इंडेक्समध्ये मिडकॅप आणि स्माॅलकॅप शेअरची चांगली खरेदी झाली. सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स १ टक्क्यापेक्षा जास्त वाढून १३१८०.७५ च्या पातळीवर बंद झाला, तर मुंबई शेअर बाजारात स्मॉलकॅप इंडेक्स १.२५ टक्के वाढीसह ११२८०.६ च्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी ऑटो, फार्मा, टेक्नॉलॉजी, बँकिंग आणि ऑइल, गॅसच्या शेअर्सची सर्वात जास्त खरेदी झाली. मुंबई शेअर बाजारात तर या सर्व शेअरची खरेदी जवळपास दोन टक्क्यांनी वाढून बंद झाली.
बातम्या आणखी आहेत...