आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Closes 204 Points Up, Nifty Ends Above 8,200

सेन्सेक्स 204 अंकांनी वाढून बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या काही तासांत जोरदार खरेदी होऊन शेअर बाजार तेजी कायम ठेवण्यात यशस्वी झाला. सेन्सेक्स २०४ अंकांनी वाढून २७,२१४ च्या पातळीवर बंद झाला, तर प्रमुख ५० शेअरचा समावेश असलेला निफ्टी ५८ अंकांनी वाढून ८२३८ च्या पातळीवर बंद झाला. शेवटच्या काही तासांतील खरेदीमुळे बाजार दिवसभराच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला.

जागतिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजारातदेखील खरेदीत वाढ दिसून आली. युरोपियन बाजारातील अर्ध्यापेक्षा जास्त देशांतील शेअर बाजारात तेजीची नोंद झाली. त्यानंतर भारतीय बाजारातदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.