आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची उसळी, सोने चकाकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार, सराफा तसेच विदेशी मुद्रा विनिमय बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स २४४.३२ अंकांनी वाढून २८,५०४.४६ वर पोहोचला. हा सेन्सेक्सचा दोन आठवड्यांचा उच्चांक आहे. निफ्टीने ७३.६५ अंकांच्या वाढीसह ८,६५९.९० ही पातळी गाठली. तिकडे विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३० पैशांनी वाढून ६२.१९ झाले. सराफा बाजारातही तेजी दिसली. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे २४० रुपयांनी वाढून २७,२५० झाले.

मागील आठवड्यात घसरणीच्या घाटात अडकलेला शेअर बाजार सोमवारी चांगलाच वधारला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर व्याजदराशी संवेदनशील असलेल्या समभागांची जोरदार खरेदी-विक्री दिसून आली.