आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात सी-सॉचा खेळ रंगला, सेन्सेक्स ५४ अंकांनी घसरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युरोपीय समुदायातून बाहेर पडायचे की नाही याबाबत ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले असून त्याच्या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी केलेला निधीचा उपसा आणि वधारलेल्या समभागातील नफावसुली यामुळे दोन दिवस तेजीच्या हिंदोळ्यावर असलेल्या शेअर बाजारात मंगळवारी घसरणीचा अनुभव आला. विक्रीच्या जोरामुळे सेन्सेक्स ५४.१४ अंकांनी घसरून २६,८१२.७८ वर आला. निफ्टी १८.६० अंकांच्या घसरणीसह ८२१९.९० वर स्थिरावला. त्यातच रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले त्याचाही दबाव शेअर बाजारावर दिसून आला.

सरकारने एफडीआयच्या नियमात सुलभता आणल्याचे पडसादही शेअर बाजारात दिसून आले. विमान वाहतूक कंपन्याच्या समभागांनी मंगळवारी सकाळच्या सत्रात तेजीची भरारी नोंदवली. नंतर मात्र त्यात घसरण झाली. सकाळच्या सत्रात बाजारात खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे तेजी होती. नंतर मोठ्या प्रमाणात नफावसुली सुरू झाली. त्यानंतर शेअर बाजारात खरेदी विक्रीचा सी-सॉ चांगलाच रंगला. स्मॉल कॅप व मिड कॅप समभागांत चांगली खरेदी दिसून आली. युरोपातील प्रमुख शेअर बाजारात ब्रिग्जिटचा परिणाम दिसून आला. फ्रान्स आणि जर्मनीच्या बाजारात तेजी तर ब्रिटनच्या बाजारात घसरण दिसून आली.
बातम्या आणखी आहेत...