Home | Business | Share Market | Sensex closes above 30,000 for first time

सेन्सेक्स पहिल्यांदाच 30,000 च्या वर बंद

वृत्तसंस्था | Update - Apr 27, 2017, 05:35 AM IST

जागतिक बाजारातून मिळालेले संकेत आणि भारतीय गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीच्या जाेरावर बुधवारी भारतीय शेअर बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स १९०.११ अंकांच्या म्हणजेच ०.६३ टक्क्यांच्या वाढीसह ३०१३३.३५ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ३० हजारांच्या वर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • Sensex closes above 30,000 for first time
    मुंबई - जागतिक बाजारातून मिळालेले संकेत आणि भारतीय गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीच्या जाेरावर बुधवारी भारतीय शेअर बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स १९०.११ अंकांच्या म्हणजेच ०.६३ टक्क्यांच्या वाढीसह ३०१३३.३५ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ३० हजारांच्या वर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेन्सेक्सने आतापर्यंत तीन वेळा ३०,००० ची पातळी गाठली आहे. याआधी ५ एप्रिल २०१७ रोजी सेन्सेक्स २९,९७४.२४ या पातळीवर बंद झाला होता. चार मार्च २०१५ रोजी सेन्सेक्सने ३०,९७४.२४ ही उच्चांकी पातळी गाठली होती. तीन दिवसांत सेन्सेक्समध्ये ७६८.०५ अंक म्हणजेच २.६२ टक्क्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीदेखील ४५ अंकांच्या म्हणजेच ०.४९ टक्क्यांच्या वाढीसह ९३५१.८५ या विक्रमी पातळीवर बंद झाला. याआधीचा विक्रम एक दिवसापूर्वी मंगळवारी ९,३०६.६० हा होता. एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील निर्देशांकात वाढ, तर आयटी आणि औषधी क्षेत्रातील निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे.

Trending