आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये ५८ अंकांची घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई शेअर बाजारात मंगळवारी शेवटच्या तासात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात पडझडीची नोंद झाली. सेन्सेक्स ५८ अंकांनी पडून २७,३०६ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीदेखील १३ अंकांच्या पडझडीसह ८२६१ च्या पातळीवर बंद झाला. युरोपियन बाजारात झालेल्या पडझडीनंतर भारतीय बाजारात ही पडझड दिसून आली.

सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा जास्त लहान शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास अर्धा टक्क्याने वाढून बंद झाला. स्मॉलकॅप शेअरमध्ये टोरेंट पॉवर, अदानी पॉवरमध्ये ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद झाली, तर स्मॉलकॅप इंडेक्सदेखील वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाला. प्रमुख क्षेत्रांमध्ये ऑटो, आयटीमध्ये वाढ दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजारात ऑटो क्षेत्रात ०.२४ टक्के, तर आयटी क्षेत्रात ०.८५ टक्क्यांनी वाढून बंद झाले. मेटलमध्ये २.१५ टक्के पडझडीची नोंद झाली.
शेअर बाजारात दिवसभराच्या खरेदीत चढ-उतार दिसून येत होता. मात्र, दुपारनंतर युरोपीय बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील दिसून आला. शेवटच्या एका तासात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सोमवारपेक्षा खालच्या पातळीवर सेन्सेक्स बंद झाला.