आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स १३४ अंकांनी घसरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लुपिन, बजाज अाॅटाे या अाघाडीच्या कंपन्यांनी तिमाहीमध्ये केलेल्या खराब अार्थिक कामगिरीमुळे बाजाराचा मूड गेला. त्यामुळे सकाळच्या सत्रातील खरेदीची हवा दुपारच्या सत्रात झालेल्या विक्रीने काढून घेतली. परिणामी सेन्सेक्स बुधवारच्या तीन महिन्यांच्या कमाल उंचीवरून खाली येत १३४.०९ अंकांनी घसरला. जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळण्याची अाशा अाणि अाशियाई शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्स सकाळच्या सत्रात २८,५७८.३३ अंकांच्याकमाल पातळीवर गेला. परंतु दुपारच्या सत्रात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स १३४.८४ अंकांनी घसरून २८,३७०.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीदेखील ४३.७० अंकांनी घसरून ८,६०० अंकांच्या पातळीखाली म्हणजे ८५८९.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.