आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीला ओहोटी; सेन्सेक्स ११५ अंकांनी गडगडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महागाईच्या चितेचे कारण देत रिझर्व्ह बँकेने आपल्या नाणेनिधी धोरणात व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजाराचा हिरमोड झाला. हताश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यात गेल्या चार दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीला ओहोटी लागून सेन्सेक्स ११५ अंकांनी गडगडला. रुपयाची भक्कम स्थिती आणि काही निवडक बँक समभागांची खरेदी झाली तरी त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही.

रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करणार नाही याचा बाजाराला अंदाज होता. त्यामुळे त्याचा फार असा काही परिणाम झाला नसल्याचे मत जिओजित बीएनपी परिबाचे संशोधन प्रमुख अॅलेक्स मॅथ्यू यांनी व्यक्त केले.

रिझर्व्ह बँकेच्या तिसऱ्या मासिक नाणेनिधी धोरणामध्ये अल्प मुदतीचे व्याजदर जैसे थे ७.२५ टक्क्यांवर ठेवले आणि रोख राखीव प्रमाणही चार टक्क्यांवर मर्यादित ठेवले. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये ७.६ टक्के आर्थिक विकास गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून त्यादृष्टीने सुधारणा होत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

बाजारात झालेल्या खरेदीमध्ये स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेच्या समभागांना मागणी आली. परंतु एचडीएफसी बँकेच्या समभागाकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली. डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी सशक्त झाल्यामुळे टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यासह अन्य माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर विक्रीचा ताण आला.

टॉप लुझर्स : हीरो मोटोकॉर्प, गेल, ओएनजीसी, विप्रो, टाटा मोटर्स, इन्फोसिस, रिलायन्स, एचडीएफसी, भारती एअरटेल, लुपिन टॉप गेनर्स : टाटा स्टील, हिंदाल्को, कोल इंडिया, स्टेट बँक,
महिंद्रा अँड महिंद्रा
निफ्टी घसरला रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची निराशा झाल्यानंतरच्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स २७,८६६.१२ अंकांच्या नीचांकी पातळीवर गेला. त्यानंतरही बाजारात थोडीफार सुधारणा झाली. पण दिवस अखेर सेन्सेक्स ११५.१३ अंकांनी घसरून २८,०७१.९३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सलग सत्रांमध्ये सेन्सेक्सने ७२७.८३ अंकांच्या वाढीची नोद केली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक २६.१५ अंकांनी घसरून ८५१६.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला जागतिक शेअर बाजारांमध्ये युरोप बाजारात चांगली वाढ झाली.