आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची २४२ अंकांनी गटांगळी, राष्ट्रीय शेअर बाजारातह पडसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीनच्या अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग अाणि एकूण जागतिक अार्थिक वाढीबद्दल निर्माण झालेल्या तीव्र चिंतेचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम झाला. तुफान विक्रीच्या माऱ्यात अमेरिकेतील शेअर बाजार गडगडला. मुंबई, राष्ट्रीय शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटून सेन्सेक्स २४२ अंकांनी खाली आला.

सेन्सेक्स २७,४४०.१० अंकांच्या नीचांकी पातळीवर उघडला अाणि नंतर ताे सातत्याने घसरत राहिला. दिवसअखेर सेन्सेक्स २४१.७५ अंकांनी घसरून २७,३६६.०७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ७२.८० अंकांनी घसरून ८३०० अंकांच्या पातळीवर गेला. दिवसभरात ८२२५.०५ अाणि ८३२२.२० अंकांच्या पातळीत राहिल्यानंतर निफ्टी दिवसअखेर ८२९९.९५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. साप्तािहक अाधारावर सेन्सेक्स ७०१.२४ अंकांनी अाणि निफ्टीमध्ये २१८.६० अंकांनी घसरण झाली. अमेरिकेच्या शेअर बाजारातील पडझड अाणि चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीचा अाशियाई बाजारावर झालेला परिणाम यामुळे सेन्सेक्स एका क्षणी ४५० अंकांनी गडगडला हाेता.

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून १००७.२६ काेटी रुपयांचा निधी काढून घेतला असल्यामुळे त्याचाही फायदा बाजाराला हाेऊ शकला नाही. डाॅलरच्या तुलनेत रुपयादेखील मधल्या सत्रामध्ये घसरून ६५.९१ रुपये अशा दाेन वर्षांच्या नीचांकी पातळीवर अाल्यामुळे त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

विदेशी गुंतवणूकदारांवर किमान पर्यायी कर (मॅट) अाकारण्याच्या प्रश्नावरून बाजारात नाराजीचे वातावरण हाेते, परंतु मॅटवरील ए. पी. शहा पॅनलने विदेशी गुंतवणूकदारांवर १ एप्रिल २०१५ पूर्वीच्या कालावधीपासून हा कर अाकारण्याचे कारण नाही, असे म्हटल्यामुळे दिलासा मिळाला.