आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात विक्रीचा भूकंप; सेन्सेक्सची ६३० अंकांनी गटांगळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक रोखे बाजारातील नरमाई आणि महत्त्वाच्या सुधारणा विधेयकांना मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब याच्या चिंतेमुळे बाजारात सरसकट विक्रीचा मारा होऊन सेन्सेक्स ६३० अंकांनी गडगडत २७,००० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

जीएसटी सुधारणा विधेयक आणि भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी अडकल्यामुळे अाता बाजाराला सरकारच्या आर्थिक सुधारणांना आणखी विलंब हाेण्याची भीती वाटत अाहे. त्यातच रुपयादेखील मधल्या दिवसात ३५ पैशांनी घसरून डाॅलरच्या तुलनेत ६४.२० रुपयांवर अाल्यामुळे बाजारात अाणखी भर पडली. या निराशेतून बाजारात तुफान विक्रीचा मारा झाला.
एिप्रलमधील किरकाेळ महागाई आणि मार्चमधील अाैद्याेिगक उत्पादनाची अाकडेवारी जाहीर हाेणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार केले. जागतिक राेखे बाजारातील चढउतार अािण ग्रीसमधील अािर्थक पेचप्रसंग याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दाेन दिवसांच्या तेजीनंतर नकारात्मक पातळीवर उघडला. बड्या समभागांची विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स २७ हजार अंकांवरून घसरून २६,८३७.३९ अंकांच्या पातळीवर अाला. दिवसअखेर सेन्सेक्स ६२९.८२ अंकांनी घसरून २६,८७७.४८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे तसेच मॅटबद्दल सरकारकडून स्पष्टता मिळाल्यानंतर सेन्सेक्स गेल्या दाेन सत्रांत ९०८.१९ अंकांनी झेपावला हाेता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १९८.३० अंकांनी घसरून ८१२६.९५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.डाॅ. रेड्डी या कंपनीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत ५१८.,८४ काेटी रुपयांचा चांगला नफा कमावल्यामुळे हा समभाग विक्रीच्या मा ऱ्यात बचावला.

फटका बसलेले समभाग
टाटा स्टील, भेल, वेदांता, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, एल अँड टी, अॅक्सिस बँक, हिंदाल्को, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, टाटा मोटर्स

दोन लाख कोटींच्या संपत्तीवर पाणी
शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांच्या दोन लाख कोटींच्या संपत्तीवर पाणी पडले. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांतील गुंतवणूकदारांची संपत्ती २,०४,७२४.६२ कोटींवरून ९९,०५,२४३ कोटींवर आली.

रुपयाची धुलाई
दोन दिवसांच्या तेजीनंतर रुपयालाही मंगळवारी घसरणीचा मारा सहन करावा लागला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३२ पैशांनी घसरून ६४.१७ वर आले. आयातदार तसेच काही बँकांकडून डॉलरला चांगली मागणी आल्याचा दबाव रुपयावर आला.
बातम्या आणखी आहेत...