आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सची माेठी गटांगळी, दुष्काळाच्या भीतीने ६६१ अंक खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अार्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर काहीशी सावध भूमिका घेत रिझर्व्ह बँकेने रेपाे दरात केवळ पाव टक्का कपात केल्यामुळे बाजाराचा अपेक्षाभंग झाला. त्यातच यंदा अपु-या पावसामुळे दुष्काळाच्या सावटाचे संकेत हवामान खात्याने दिल्यामुळे बाजाराच्या चिंतेत अाणखी भर पडली. त्यातून झालेल्या तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स ६६१ अंकांनी गडगडत २७,१८८.३८ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

रिझर्व्ह बँकेने नवीन अार्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर व्याजदरात तिस-यांदा पाव टक्क्याने कपात केली; परंतु त्याच वेळी नजीकच्या काळात अाणखी व्याजदर कपात न करण्याचे संकेत दिल्यामुळे बाजारात नाराजीचे वातावरण पसरले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून अपुरा म्हणजे सर्वसाधारणपेक्षा कमी हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाची भीती निर्माण झाली अाहे. याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २७,९०२.५३ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. परंतु रिझर्व्ह बँकेने नाणेनिधी धाेरण जाहीर केल्यानंतर बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. आणि सेन्सेक्स २७,१४६.६८ अंकांच्या नीचांकी पातळीवर अाला. दिवसअखेर सेन्सेक्स ६६०.६१ अंकांनी घसरून २७,१८८.३८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सहा मेनंतरची सेन्सेक्सचीही सर्वात माेठी घसरण अाहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ८३०० अंकांच्या पातळीवरून खाली अाला. दिवसअखेर निफ्टी १९६.९५ अंकांनी घसरून ८२३६.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

नफ्यावर परिणाम
सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी पाऊस, तेलाच्या वाढलेल्या किमती, पीक उत्पादनातील घट यामुळे येथून पुढे महागाईत वाढ हाेण्याची शक्यता अाहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम हाेण्याची शक्यता अाहे.
हिरेन ढकान, सह निधी व्यवस्थापक, बाेनान्झा पाेर्टफाेलिअाे.

कमी पावसाचा अंदाज
हवामान खात्याने यंदा पावसाला विलंब हाेण्याबराेबरच कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे बाजारावर परिणाम झाला.
जयंत मांगलिक, अध्यक्ष, किरकाेळ वितरण