आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Ends 256 Points Down; Nifty Below 7,800 mark; Vedanta Top Loser

बाजारातील तेजीचा मूड पुन्हा गेला, सेन्सेक्स 256 अंकांनी घसरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- किरकोळ महागाईतील वाढ आणि औद्योगिक उत्पादनातील घट यामुळे बाजारातील तेजीचा मूड पुन्हा गेला. मुहूर्ताच्या सौद्यांवेळी चांगली तेजी दर्शवणारा बाजार शुक्रवारी घसरला. सेन्सेक्स २५६.४२ अंकांनी घटून २५,६१०.५३ वर आला. सेन्सेक्सचा हा दोन महिन्यांचा नीचांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६२.७५ अंकांनी घसरून ७७६२.२५ वर स्थिरावला. आर्थिक आकडेवारीने बाजारातील वातावरण नकारात्मक बनल्याचे चित्र होते.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने चार महिन्यांचा नीचांक गाठला आहे. ऑगस्टमध्ये चांगली वाढ नोंदवणारा हा निर्देशांक सप्टेंबरमध्ये घसरला. किरकोळ महागाईनेही आता ५ टक्क्यांची पातळी गाठली आहे. गुरुवारी सरकारकडून ही आकडेवारी जाहीर झाली. दिवाळी बलिप्रतिपदेमुळे गुरुवारी बाजाराला सुटी होती. परिणामी शुक्रवारी बाजारात या आकडेवारीचे पडसाद उमटले. अमेरिका फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ करणार असल्याच्या भीतीने जगातील प्रमुख शेअर बाजारांत घसरणीचा कल दिसून आला. आशियातील चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान बाजारात ०.५१ ते २.१५ टक्के घसरण झाली.