आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Ends 43 Points Down, Nifty50 Settles At 7,784

शेअर बाजारात चढ-उतार, सेन्सेक्स 43 अंकाने खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीनच्या इक्विटी बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे भारतातील बाजारानेदेखील गटांगळ्या खाल्ल्या. मंगळवारी झालेल्या व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि िनफ्टी किरकोळ घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४३ अंकाच्या घसरणीसह २५,५८० च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी सात अंकाच्या घसरणीसह ७७८४ च्या पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारातील अॅनर्जी, कमोडिटी आणि मेटल स्टॉक्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निर्देशांकाला मदत मिळाली. चीनमध्ये राहत पॅकेज मिळाल्यामुळे मेटल इंडेक्स ३.२० टक्क्यांनी वाढून १८६२ च्या पातळीवर बंद झाला. तर कमोडिटीमध्ये १.१८ टक्के आणि अॅनर्जी इंडेक्समध्ये १.०२ टक्क्यांची वाढ झाली. वास्तविक बँक, आॅटो, पीएसयू बँक इंडेक्समध्ये अर्धा टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० शेअरपैकी २७ शेअरमध्ये घसरण झाली. तर २३ स्टॉक्स तेजीसह बंद झाले. विशेष करून टाटा स्टील, वेदांता लिमिटेड, गेल इंडिया, एशियन पेंट्स आणि हिंदाल्कोमध्ये दोन ते सहा टक्क्यांची वाढ झाली. पीएनबी, बँक आॅफ बडौदा, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, एचयूएस १.५ टक्क्याने घसरून बंद झाले.

बाजार नकारात्मक
पुढीलकाही काळासाठी बाजार नकारात्मक स्थितीत राहणार असल्याचे मत एल्पस एनलिटिक्सचे अमित हर्चेकर यांनी व्यक्त केले आहे. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप आणि निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये चढ-उतार दिसण्याची शक्यता असल्याचेही हर्चेकर यांनी सांगितले.

चीनमधील बाजारामुळे मदत
चीनमध्ये सेन्ट्रल बँकने व्यवस्थापनात १३,००० कोटी युअान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाजाराला आधार मिळाला. असे असले तरी १३,००० कोटी युआनची मदत कमी असून यामुळे फक्त लिक्विडिटी वाढेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मदतीला राहत पॅकेज असे म्हटले जाऊ शकत नाही. बाजाराला आणखी मदतीची अपेक्षा आहे. तसेच युआनच्या स्थितीवरदेखील रुपयाचे लक्ष राहणार आहे.