आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sensex Ends Flat But Posts First Weekly Gain In Five

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स, निफ्टी झाले सपाटीवर बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातील शेवटच्या दिवशी भारतीय बाजार सपाटीवर बंद झाले. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स २६५ अंकांच्या वरच्या पातळीवर गेला होता. मात्र, सत्राच्या शेवटच्या काही तासांमध्ये झालेल्या नफारूपी विक्रीच्या मार्‍यात तो खाली आला, तर नि‍फ्टीदेखील दिवसभराच्या वरच्या पातळीवरून ७५ अंकांनी खाली आला.

बाजारात मेटल, इन्फ्रा, ऑटो आणि कमोडिटीमध्ये विक्रीचा मारा सुरूच होता. त्यामुळे बाजारावर दबाव आला. शेवटी ३० शेअरच्या प्रमुख निर्देशांकामध्ये सेन्सेक्स १२ अंकांच्या छोट्याच्या पडझडीसह २५,६१० अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर नि‍फ्टी एका अंकाच्या वाढीसह ७,७८३ अंकांवर बंद झाला.