आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Extends Rally, Jumps 402 Pts On Upbeat Global Cues

जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स ४०२ अंकांनी वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक शेअर बाजारातील भक्कम वातावरणामुळे सलग दुसर्‍या िदवशी बाजारात खरेदीचा जाेर राहिला. धातू, स्थावर मालमत्ता, वाहन कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्समध्ये ४०२ अंकांची वाढ हाेऊन ताे २५,७१९.५८ अंकांच्या एका आठवड्याच्या कमाल पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६५ अंकांनी वर गेला आणि त्यानंतर चढती कमान कायम राखत त्याने २५,८२०.५६ अंकांची कमाल पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स ४०१.७१ अंकांनी वाढून २५,७१९.५८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दाेन सत्रांत सेन्सेक्स ८२६ अंकांनी वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १३०.३५ अंकांनी वाढून ७८१८.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. डाॅलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी सशक्त झाल्यामुळेदेखील बाजाराचा हुरूप वाढला.
दूरसंचार कंपन्यांना अन्य सेवा पुरवठादारांना रेडिआे लहरींची विक्री करण्याची परवानगी देण्यासह अन्य काही सुधारणांची घाेषणा केल्यामुळेही बाजारात उत्साहाचे वातावरण िनर्माण झाले. वॉलस्ट्रीट शेअर बाजारात आलेली तेजी, आशियाई शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण, सरकारकडून नव्याने आर्थिक मदत मिळाल्यानंतर चीनच्या बाजारात स्थिरता येण्याची अपेक्षा, जपानच्या शेअर बाजारात झालेली वाढ या सगळ्या सकारात्मक गोष्टींचादेखील बाजारावर चांगला परिणाम झाला.

भांडवल बाजारात सगळ्याच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली, पण त्यातही धातू, वाहन आणि स्थावर मालमत्ता या क्षेत्रीय समभागांना चांगली मागणी आल्याचे मनोज छाब्रिया या िदल्लीतील ब्राेकरने सांगितले. विदेशी बाजारात युराेप शेअर बाजार उशिरा झालेल्या व्यवहारांमध्ये उंचावर गेला.