आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सला उतरती कळा, ६२ अंकांची घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील भेल या कंपनीने जूनअखेर संपलेल्या तिमाहीत आर्थिक निकालामध्ये केलेली खराब कामगिरी आणि काही निवडक समभागांमध्ये झालेल्या नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्समध्ये ६२ अंकांची घसरण झाली. वास्तविक दोन दिवसांच्या तेजीचा परिणाम म्हणून सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडला, परंतु अमेरिकेची आर्थिक आकडेवारी जाहीर होण्याअगोदर गुंतवणूकदारांनी नफारूपी कमाई करण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे सेन्सेक्सला उतरती कळा लागली.

सेन्सेक्स २८,३२७.११ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला आणि त्यात आणखी वाढ हाेऊन तो २८,३३५.६७ अंकांच्या दिवसभरातल्या कमाल पातळीवर गेला, परंतु वरच्या पातळीवर झालेल्या नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर ६१.७४ अंकांनी घसरून २८,२३६.३९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांक २४.०५ अंकांनी घसरून ८५६४.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला.