आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरण सुरूच : आयटी, फार्मा क्षेत्रात तेजी, सेन्सेक्स 81 अंकांनी घसरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवसभराच्या व्यवहारात झालेल्या चढ-उतारानंतर देशातील शेअर बाजार ०.३५ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ८१ अंकांच्या घसरणीसह २४,७७३ च्या पातळीवर बंद झाले, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी २५ अंकांच्या घसरणीसह ७५३६ च्या पातळीवर बंद झाले. दिवसभराच्या व्यवहारात आयटी आणि फार्मा निर्देशांकात तेजी दिसून आली.

राष्ट्रीय शेअर बाजारात आयटी, एफएससीजी आणि फार्मा निर्देशांकात दिवसभर तेजीसह व्यवहार झाले. आयटी निर्देशांक १.३० टक्क्यांनी वाढून १०,९८१ च्या पातळीवर बंद झाला, तर एफएमसीजी आणि फार्मा निर्देशांकात अर्धा टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. याव्यतिरिक्त बँक, ऑटो, मेटल, रिअल्टी आणि पीएसयू बँक निर्देशांकात दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली. गुरुवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० पैकी ३१ स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.

इन्फोसिसमध्ये पाच टक्क्यांची वाढ
अॅक्सिस बँक, टाटा स्टील, बीएचईएल, टाटा माेटर्समध्ये तीन ते चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली, तर चांगल्या तिमाही निकालानंतर इन्फोसिस पाच टक्के, तर लुपिनमध्ये नंतर झालेल्या खरेदीमुळे ३.३५ टक्के आणि एशियन पेंट्स २.५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

इन्फोसिसच्या तिमाही निकालाचा परिणाम
जागतिक शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे देशातील शेअर बाजारातदेखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये सुमारे ३०० अंकांची घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र, इन्फोसिसच्या तिमाही निकालाची आकडेवारी आणि आशियाई बाजारात आलेल्या किरकोळ रिकव्हरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुधारणा झाली.