आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग सातव्या सत्रात सेन्सेक्स गडगडला, साडेतीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फाेसिसच्या अार्थिक निकालांनी बाजाराची साफ निराशा केली. त्यातूनच झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स २९७ अंकांनी गडगडून साडेतीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सलग सातव्या सत्रात सेन्सेक्सची घसरगुंडी झाली अाहे.

मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत इन्फाेसिसच्या निव्वळ नफ्यात ४.७ टक्क्यांनी, तर महसुलातही २.८ टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे बाजाराचा हिरमाेड झाला. सरकारने करदाव्यांबाबत विचार करण्यात येत असल्याचे स्पष्ट करूनही भांडवल बाजारातून माेठ्या प्रमाणावर विदेशी निधीचा अाेघ बाहेर जात अाहे. कंपन्यांची निराशाजनक अार्थिक कामिगरी अाणि यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे बाजारात निराशेचे वातावरण पसरले अाहे.