आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीनंतर सेन्सेक्सची पुन्हा अापटी, दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवरून खाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -दाेन दिवसांच्या तेजीनंतर बाजारात पुन्हा एकदा ग्रीसमधील अनिश्चिततेच्या वातावरणाचे निमित्त घडले अाणि गुंतवणूकदारांनी व्यवहारापासून दूर राहणे पसंत केले. बाजारात उशिरा झालेल्या विक्रीमध्ये धातू अाणि माहिती तंत्रज्ञान समभागांना माेठा फटका बसला. दिवसअखेर सेन्सेक्स दाेन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवरून खाली अाला.
अाशियाई शेअर बाजारात चांगले वातावरण असल्यामुळे सुरुवात चांगली झाली, परंतु कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बाजारात चढ-उताराचे वातावरण निर्माण झाले. सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीत सेन्सेक्स ७५ अंकांनी गडगडला. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात २८,११५.९६ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. परंतु नंतर झालेल्या चाैफेर विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स ७५.०७ अंकांनी घसरून २७,९४५.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला. िनफ्टी ८.१५ अंकांनी घसरून ८४४४.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला.