आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सची गटांगळी, फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढीची धास्ती, १३ अंकांची घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अायटीसी या अाघाडीच्या कंपनीला चाैथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळाल्याचा परिणाम बाजारावर झाला. त्यामुळे बाजारात झालेल्या नफारूपी विक्रीने सेन्सेक्स ३१३ अंकांनी घसरून २७,६४३.८८ अंकांच्या पातळीवर तर निफ्टी ८,४०० अंकांच्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स कमकुवत पातळीवर उघडला. विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्सने २७,६१४.३२ अंकांची नीचांकी गाठली हाेती. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स ३१३.६२ अंकांनी घसरून २७,६४३.८८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स १४८.१५ अंकांनी वधारला हाेता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ८८.७० अंकांनी घसरून ८३७०.२५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्याच्या अपेक्षेमुळे गेल्या काही सत्रात बाजारात तेजी अाली हाेती. ही तेजी कॅश करण्यासाठी गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्रीचा मारा केला. अायटीसी कंपनीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत केलेल्या निराशाजनक कामिगरीमुळेदेखील बाजाराचा मूड गेला. अायटीसीवर विक्रीचा ताण अाल्यामुळे कंपनीची समभाग किंमत ३.२९ टक्क्यांनी घसरली. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीमुळे स्माॅलकॅप निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी, तर मिडकॅप निर्देशांक ०.०८ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यामुळे सकाळच्या सत्रात युराेप शेअर बाजारात नरमाईचे वातावरण हाेते.

हे समभाग घसरले
एचडीएफसी, टाटा स्टील, गेल. सिप्ला, टाटा माेटर्स, स्टेट बँक, काेल इंडिया, डाॅ. रेड्डी लॅब, हिंदाल्काे, अॅक्सिस बँक, एल अॅँड टी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा पाॅवर, इन्फाेसिस, रिलायन्स, एनटीपीसी, टीसीएस, हीराे माेटाेकाॅर्प, अायसीअायसीअाय बँक, बजाज अाॅटाे, एचडीएफसी बँक, भेल.
बातम्या आणखी आहेत...