आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मॅट’च्या धास्तीने बाजाराची घसरगुंडी, सेन्सेक्स १५५ अंकांनी गडगडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मॅट’च्या कायद्यात सुधारणा करण्याचा सरकार िवचार करत असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही करदाव्यांबाबत विदेशी गुंतवणूकदारांमध्ये साशंकता कायम अाहे. या चिंतेतूनच बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सकाळच्या सत्रातील सर्व कमाई धुऊन निघाली अाणि सेन्सेक्स १५५ अंकांनी गडगडला.

हवामान बदल या विषयावरील एका परिसंवादामध्ये वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केंद्र सरकार मॅटच्या नियमात सुधारणा करण्याबाबत विचार करत असल्याचे स्पष्ट केले; परंतु तरी या कायद्याबाबत विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चिंता कायम अाहे. त्यामुळे शेवटच्या सत्रात विक्रीचा मारा झाला.

कंपन्यांच्या ितमाही िनकालांनी केलेली िनराशा, सर्वसाधारणपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज, िरझर्व्ह बँकेकडून व्याजदर घटण्याची कमी असलेली शक्यता, डाॅलरच्या तुलनेत रुपयाला िमळालेली बळकटी या सगळ्यांचादेखील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

मुंबई शेअर बाजाराचा िनर्देशांक २७,९७७.२७ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामाेडींच्या अाधारावर सकाळच्याच सत्रात सेन्सेक्सने २८ हजार अंकांची पातळी गाठली हाेती; परंतु नंतर अगदी शेवटच्या एका तासात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स १५५.११ अंकांनी घसरून २७,७३५.०२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या सात सत्रांमध्ये सहाव्यांदा सेन्सेक्सची पडझड झाली अाहे. संसदेच्या िवद्यमान सत्रातच ‘जीएसटी’ विधेयक संमत करण्यात येणार असल्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी िदल्यामुळे बुधवारी सेन्सेक्सने २१४.१९ अंकांची कमाई केली हाेती. िनफ्टीचा िनर्देशांकदेखील ३१.४० अंकांनी घसरून ८३९०.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

टाॅप लुझर्स
सन फार्मा, स्टेट बँक, टाटा माेटर्स, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, अाेएनजीसी, डाॅ. रेड्डीज लॅब, एल अँड टी, इन्फाेसिस, विप्राे, रिलायन्स.

टाॅप गेनर्स
काेल इंिडया, भेल, बजाज अाॅटाे, भारती एअरटेल, सिप्ला, हिंदाल्काे, सेसा स्टर्लाइट, टाटा पाॅवर, टाटा स्टील, टीसीएस.