आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स २१० ने आपटला, निफ्टी ८,४०० च्या खाली; सलग पाचव्या दिवशी घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पूर्वलक्षी कराच्या नोटीसबाबत नाराज असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका कायम राखल्याने मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. औषधी व एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीने ही घसरण वाढवली. सेन्सेक्स २१०.१७ अंंकांनी घसरून २७,६७६.०४ वर आला. निफ्टी ७०.३५ अंकांनी घटून ८,३७७.७५ वर बंद झाला. निफ्टीने ८४०० ही महत्त्वाची पातळी सोडली.

पूर्वलक्षी करापोटी ४० हजार कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस प्राप्तिकर खात्याने विदेशी गुंतवणूकदार संस्थांना एफआयआय) पाठवली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या एफआयआयनी शेअर बाजारात विक्रीचा धडाका लावला आहे. त्यामुळे सोमवारीही सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी घसरला होता. मंगळवारीही ही विक्रीची लाट कायम राहिल्याने सेन्सेक्स कोसळला. त्यातच चौथ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरीही गुंतवणूकदारांना अपेक्षेप्रमाणे होत नसल्यानेही विक्रीचा कल वाढतो आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया त्रेसष्ठीच्या नजीक पोहोचल्याचा दबाव बाजारात दिसून आला.

कंपन्यांकडूनही निराशा
विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीबरोबरच देशातील कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. हे आर्थिक निकाल बाजारातील कलासाठी निर्णायक ठरणार आहेत. : विनोद नायर, रिसर्च हेड, जिओजित बीएनपी परिबास.

घसरलेले क्षेत्रीय निर्देशांक
क्षेत्रघट
हेल्थकेअर३.२४ टक्के
ऑटो१.३१ टक्के
एफएमसीजी१.१७ टक्के
ऑइल अँड गॅस१.०८ टक्के
पॉवर०.७३ टक्के
भांडवली वस्तू०.४८ टक्के
रिअॅल्टी०.३७ टक्के