आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सची सलग दुसऱ्या दिवशी अापटी, ११२ अंकांनी गडगडला निर्देशांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी अाणि त्यातच अायटीसी, टाटा माेटर्स अाणि वेदांतसारख्या बड्या कंपन्यांनी मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत नफ्यात केलेली निराशा यामुळे बाजाराचा मूड बदलला. बाजाराला दिशा मिळेल अशा काेणत्याही घडामाेडी नसल्याने गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरून २७,५३१ अंकांच्या अाठवड्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी घसरणीचा सूर अाळवत सेन्सेक्स ११२ अंकांनी गडगडत २७,५३१.४१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील ३०.९० अंकांनी घसरून ८३३९.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
‘मॅगी’मुळे नेस्लेचा समभाग बेचव
मॅगीनूडल्समध्ये जस्ताचे प्रमाण हे प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे दिसून अाल्याने उत्तर प्रदेशातील अन्न सुरक्षा अाणि अाैषध प्रशासन विभागाकडून कंपनीच्या विराेधात तक्रार दाखल हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे बाजारात नेस्लेच्या समभागांवर विक्रीचा ताण अाला. दिवसभरात या समभागाची किमत सहा टक्क्यांनी घसरली हाेती. दिवसअखेर या समभागाच्या किमतीत २.१०%नी घट झाली.
बातम्या आणखी आहेत...