आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स १९ महिन्यांतील नीचांकी पातळीवर, बाजारात दुसऱ्या आठवड्यातही घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजार १९ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला. जागतिक बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ०.४४ टक्क्यांनी घसरून बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०९ अंकांनी घसरून २४,८२५ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३७ अंकांनी घसरून ७,५६३.८५ च्या पातळीवर बंद झाला. वास्तविक दिवसभराच्या व्यवहारात बाजारात एकदा ३०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. मात्र, जागतिक बाजारात खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्समध्ये सुमारे २०० आणि निफ्टीमध्ये ७० अंकांची रिकव्हरी झाली.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. या घसरणीला अद्याप ब्रेक लागलेला नाही. चार जून २०१४ (सेन्सेक्सची २४,८०५ ची पातळी) नंतर पहिल्यांदाच २४,८०२ च्या पातळीवर बंद झाला आहे. ही १९ महिन्यांची नीचांकी पातळी आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० स्टॉक्समधील ३२ स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. विप्रो, एम अँड एम, अदानी पोटर्स आणि टेक महिंद्रा तीन टक्क्यांपेक्षा जास्तीने घसरून बंद झाले, तर वेदांता लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्समध्ये चार टक्क्यांपेक्षा जास्तीची तेजी दिसून आली.

अमेरिकेचा परिणाम
अमेरिकेत रोजगाराची आकडेवारी चांगली आल्यामुळे शेअर बाजाराला या आठवड्यात चांगला ट्रिगर मिळाला असल्याचे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनी व्यक्त केले. या आठवड्यात बाजारात सकारात्मकता दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाजार वाढण्याचीच जास्त शक्यताही त्यांनी वर्तवली.