आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसच्या दिवाळखोरीचा धसका; सेन्सेक्स घसरला, ६०० अंकांची गटांगळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्रीस अर्थव्यवस्था दिवाळखाेरीच्या खाईत जाण्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांना माेठा धक्का बसला. या धक्क्यामुळे सकाळच्या सत्रातच सेन्सेक्सने ६०० अंकांची गटांगळी खाल्ली, परंतु दुपारनंतरच्या सत्रात किंमत घसरलेल्या काही निवडक बड्या समभागांची खरेदी झाल्यामुळे बाजारात सुधारणा झाली. सेन्सेक्स दिवसअखेर १६२ अंकांनी घसरून २७,६४५.१५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

ग्रीसने अापल्या येथील बँका बंद ठेवल्या असून साेमवारपासून सहा दिवस बँका बंद ठेवण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. त्यामुळे अाता ग्रीस दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर येऊन युराेझाेनमधून बाहेर पडण्याची शक्यता अाहे. ग्रीसच्या या वातावरणामुळे सलग दुसऱ्या दिवशी घसरणीची नाेंद करताना सेन्सेक्स सकाळच्या सत्रात खालच्या पातळीवर उघडला अाणि त्यानंतर ग्रीसमधील अार्थिक संकटामुळे चिंताक्रांत झालेल्या बाजारात तुफान विक्रीचा मारा सुरू झाला. त्यामध्ये सेन्सेक्स ६०२.६५ अंकांनी घसरून २७,२०९.१९ अंकांच्या खालच्या पातळीवर अाला. परंतु नंतर काही प्रमाणात खरेदीचा पाठिंबा मिळाल्यामुळे घसरणीला थाेडासा लगाम बसला तरीही सेन्सेक्स दिवसअखेर १६६.६९ अंकांनी घसरून २७,६४५.१५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांकदेखील ८२०० अंकांच्या खालच्या पातळीवर गेला. परंतु दिवसअखेर त्यात सुधारणा हाेऊन निफ्टी दिवसअखेर ६२.७० अंकांनी घसरून ८३१८.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला.
रुपयाचाही परिणाम
चलन बाजारामध्ये मधल्या सत्रात डाॅलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी घसरून ६३.९० रुपयांच्या पातळीवर अाला. त्याचाही नकारात्मक परिणाम हाेऊन बाजारात विक्रीचा जाेर वाढला.
बातम्या आणखी आहेत...