आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजारातील घसरण थांबताना दिसत नाही. बुधवारी सलग सहाव्या दिवशी बाजार पडझडीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरून २५०३६ च्या पातळीवर बंद झाला. तर िनफ्टी ८९ अंकांनी पडून ७६१३ च्या पातळीवर बंद झाला.
गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला आहे. या दरम्यान निफ्टीमध्ये देखील ३०० अंकांनी पडझड झाली आहे, तर कोल इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअरमध्ये या दरम्यान १० टक्क्यांची पडझड झाली. जागतिक बाजारातील संकेत आणि जीएसटी अटकण्याची शक्यता यामुळे शेअर बाजारात घसरण होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.