आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Gained 473 Points, Nifty Advanced 145 Points

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, जोरदार तेजीसह बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी आशियाई आणि युरोपीय बाजारात झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअर्सचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४७३ अंकांनी वाढून २४४३५ च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअर्सचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक १४५ अंकांच्या तेजीसह ७४२२ च्या पातळीवर बंद झाला.
शुक्रवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात बाजारात चहुबाजूने खरेदी दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वेच्या सर्व निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. बँक निफ्टी २.६२ टक्के, ऑटो ३.९२ टक्के, मेटल ४.३५ टक्के आणि पीएसयू बँक ५.०३ टक्क्यांच्या जोरदार तेजीसह बंद झाले. वास्तविक आयटी स्टॉक्सचे प्रदर्शन खराब राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारातील आयटी निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी वाढून ११,००६ च्या पातळीवर बंद झाले.
राष्ष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेल्या निफ्टीत समावेश असलेल्या ५० स्टॉक्समधील ४३ मध्ये खरेदी दिसून आली. गेल इंडियाचे स्टॉक ७.६५ टक्के, एम अंॅड एम ५.४३ टक्के, हिंदाल्को ५.२७ टक्के, मारुती सुझुकी ५.१५ टक्के आणि एसबीआय ५ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर तिमाही निकाल खराब आल्यानंतर आयडिया ६.०१ टक्के, भारती एअरटेल ३.२० टक्के आणि एचयूएलमध्ये ०.३४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
२० टक्क्यांची वाढ
मिडकॅप स्टॉक्समध्ये रॅलिस इंडिया, जेके सिमेंट, रेलिगेअर इंटरप्रायजेस, युनिकेम लॅब्स आणि जुबिलँट लाइफ सर्वात जास्त १२ ते ८.३ टक्क्यांनी वाढून बंद झाले. स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये वीनस रेमेडीज, कॅप्लिन लॅब्स, इंटरनॅशनल पेपर, जिंदल ड्रिलिंग आणि कोठारी प्राॅडक्ट्स सर्वात जास्त १९.९ ते १४.२ टक्क्यांनी वाढून बंद झाले.
या कारणामुळे तेजी
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली रिकव्हरी आणि युरोपीय सेंट्रल बँकेचे अध्यक्ष मारिओ द्रागी यांनी राहत पॅकेज देण्याचे संकेत दिल्याने इक्विटी बाजारात खरेदी परत दिसून आली.
चांगला परतावा
सध्याच्या बाजाराची स्थिती पाहता दोन वर्षांत चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याचे मत एसएमसीचे संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी व्यक्त केले आहे.