आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारणांच्या चिंतेतून बाजारात आपटबार, सेन्सेक्सची ७२३ अंकांनी गटांगळी, २७ हजारांखाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जीएसटीच्या तसेच अन्य सुधारणा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबद्दल बाजारात गेल्या काही दिवसांपासून चिंतेचे वातावरण अाहे. अाज त्याचा कडेलाेट झाला. कडक राजकीय विराेधामुळे जीएसटीसारखे महत्त्वाचे विधेयक संमत हाेण्यास लागत असलेल्या विलंबाबद्दल बाजारात चिंतेेचे वातावरण निर्माण झाले. ‘मॅट’ कराबद्दल वित्तमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन त्याबाबतची संभ्रमावस्था कायम असून उत्पादन क्षेत्रातील घसरणीची भर त्यात पडली. त्यामुळे बाजारात झालेल्या चाैफेर विक्रीच्या मा-यात दिवसअखेर सेन्सेक्स ७२२.७७ अंकांनी घसरून २६,७१७.३७ अंकांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या पाच महिन्यांचा हा नीचांक अाहे. माेदी सरकार सत्तेत अाल्यानंतरची एका दिवसातील दुसरी सर्वात माेठी घसरण अाहे. निफ्टीचा निर्देशांकदेखील २२७.८० अंकांनी घसरून ८,१०० अंकांच्या खाली म्हणजे ८,०९७ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
केवळ मॅट अाणि सुधारणांच्या चिंतेमुळेच नाही, तर अाज सकाळपासून सा-या शेअर बाजाराचे कान बाॅलीवूडचा अभिनेता सलमान खान याच्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘हिट अँड रन’ खटल्याच्या निकालाकडे लागले हाेते. कारण बहुतांश एचएनअाय गुंतवणूकदार अाणि ट्रेडर्स अापला निधी शेअर बाजाराबराेबरच, स्थावर मालमत्ता अाणि चित्रपट उद्याेगाकडेही वळवत असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने खटल्याचा निकाल महत्त्वपूर्ण हाेता. त्याचाही काहीसा परिणाम बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
घसरणीची कारणे
विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर लावण्यात अालेला किमान पर्यायी कर अाणि त्यातून निर्माण झालेली संभ्रमावस्था, मार्चच्या तिमाहीतील कंपन्यांचे निराशाजनक अार्थिक निकाल, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची व्यक्त करण्यात अालेली भीती अादी विविध कारणांमुळे गेल्या तीन अाठवड्यांमध्ये सेन्सेक्स जवळपास २,४०० अंकांनी खाली गेला असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे संशाेधन प्रमुख हितेश अगरवाल यांनी सांगितले.
या समभागांना बसला फटका भेल, अायसीअायसीअाय बँक, एल अँड टी, मारुती सुझुकी, एनटीपीसी,सिप्ला, अाेएनजीसी, अॅक्सिस बँक, टाटा पाॅवर.
सलमानला शिक्षा, मंधाना, इराॅसवर संक्रांत
मंधाना इंडस्ट्रीज : सलमानच्या ‘बीइंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेशी मंधाना इंडस्ट्रीजचा संबंध अाहे. बीइंग ह्युमन या ब्रँड अंतर्गत कपड्यांचे विपणन, विक्री अाणि िडझाइन करण्यासाठी मंधाना इंडस्ट्रीजने सलमान खान फाउंडेशनच्या बीइंग ह्युमनबराेबर विशेष परवाना करार केला अाहे. मंधानाच्या समभाग िकमतीत िदवसभरात ४.७४ टक्क्यांनी घसरण हाेऊन ताे २६३.१० रुपयांवर अाला हाेता.