आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स अठ्ठावीस हजार अंकांच्या पातळीवर, अडीच महिन्यांनंतर खरेदीचे शिखर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीत झालेली सुधारणा, बँकांना भांडवली सक्षम करण्याबाबत मिळालेले सरकारकडून अाश्वासन यामुळे बाजारात झालेल्या चाैफेर खरेदीत सेन्सेक्सने सव्वादाेन महिन्यांनी २८ हजार अंकांचे शिखर गाठले.

बाजाराचा अात्मविश्वास पुन्हा एकदा वाढला अाहे. त्यातून ग्रीस बेलअाऊटचा पर्याय स्वीकारण्याचा विचार करीत असल्यामुळे जागतिक बाजारात अालेल्या तेजीमुळे खरेदीचा जाेर वाढला, असे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.

मागील सत्रात १३५ अंकांची कमाई केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने दिवसभरात २८ हजार अंकांची पातळी सर करून २८,०९९.२५ अंकांची सर्वाधिक पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स २४०.०४ अंकांची उसळी मारून २८,०२०.८७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. या अगाेदर १७ एप्रिलला सेन्सेक्सने २८,४४२.१० अंकांची कमाल पातळी गाठली हाेती, निफ्टीचा निर्देशांकदेखील ८४०० अंकांच्या पातळीच्या पलीकडे गेला. निफ्टी ८४.५५ अंकांनी वाढून ८४५३.०५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजारात झालेल्या खरेदीत भांडवली वस्तू, बँका, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, वाहन, माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान समभागांना चांगली मागणी अाली. मे महिन्यामध्ये अाठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांमध्ये ४.४ टक्क्यांची गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक वाढ नाेंदवण्याचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.

कर्जदारांचा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी ग्रीसने दाखवल्यामुळेदेखील बाजाराला माेठा दिलासा मिळाला. राष्ट्रीयीकृत बँकांना तीन वर्षांमध्ये पुरेशा प्रमाणात भांडवल देऊन सशक्त करण्याचे अाश्वासन सरकारने दिल्यामुळे बँक समभागांना चांगली मागणी अाली.

टाॅप गेनर्स
स्टेट बँक, अायसीअायसीअाय बँक, अॅक्सिस बँक, भेल, टाटा माेटर्स, टीसीएस, एल अँड टी, विप्राे, अाेएनजीसी, इन्फाेसिस, वेदांत, भारती एअरटेल.