आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदर कपातीच्या अाशेवर बाजारात खरेदीला जाेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महागाई अाणि अाैद्याेगिक उत्पादनात घट झाल्यामुळे बाजाराच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षा उंचावल्या. त्यातून झालेल्या खरेदीमध्ये बँका अाणि वाहन समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्समध्ये ३७३ अंकांची वाढ झाली. त्याचप्रमाणे काही समभागांचा समावेश एमएससीअाय इंडिया इंडेक्समध्ये झाल्याचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
एमएससीअाय इंकने भारती इन्फ्राटेल, अायशर माेटर्स, लुपिन अाणि भारत फाेर्ज यांच्यासह अाठ कंपन्यांचा समावेश या निर्देशांकात करण्याची घाेषणा केली अाहे. सध्या या निर्देशांकामध्ये इन्फाेसिस, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स, सन फार्मा, अायटीसी या कंपन्या अाहेत.

किरकाेळ महागाईने एप्रिल महिन्यात चार महिन्यांचा नीचांक गाठला असून अाैद्याेगिक उत्पादनाची वाढदेखील मार्च महिन्यात पाच महिन्यांच्या खालच्या पातळीपर्यंत घसरली अाहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक नाणेनिधी धाेरण अाढाव्यामध्ये व्याजदर कमी करण्याची अपेक्षा उंचावली अाहे. त्यातूनही खरेदीचा जाेर वाढला.

प्रारंभी चढ- उतारामुळे सेन्सेक्स २७ हजार अंकांच्या महत्त्वाच्या पातळीवर गेला अाणि नंतर त्याने २७,२९९.८० अंकांची पातळी गाठली; नंतर झालेल्या नफेखाेरीमध्ये सेन्सेक्स घसरून २६,७५०.०१ अंकांच्या खालच्या पातळीवर अाला. एचएसबीसीने भूमिका बदलून भारताच्या पतमानांकनाला ‘नियंत्रणा’खाली ठेवण्यात अाले असल्याचे म्हटले; परंतु एचएसबीसीने पतमानांकन कमी करूनदेखील बाजारात खरेदीचे वारे वाहिले. त्यामुळे मधल्या सत्रानंतर खरेदीच्या बळावर सेन्सेक्समध्ये ३७३.६२ अंकांची वाढ हाेऊन ताे २७,२५१.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १०८.५० अंकांनी वाढून ८२३५.४५ अंकांच्या चांगल्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...