आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची पहिल्यांदाच विक्रमी 32,000 अंकांच्या पुढे झेप, निफ्टीही 9900 च्या जवळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सेन्सेक्सने गुरुवारी पहिल्यांदाच 32 हजार अंकांचा आकडा पार केला. सुरुवातीला वेगाने झालेल्या व्यवहारांनंतर सेन्सेक्स विक्रमी 32,031 अंकांपर्यंत पोहोचला. सध्या सेन्सेक्स 197 अंकांच्या वाढीसह 32001च्या स्तरावर आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 52 अंकांच्या वाढीसह 9868 अंकांपर्यंत आला आहे. व्यवहारादरम्यान कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस, पॉवर, बँकिंग, मेटल, एफएमसीजी, फार्मा आणि रिअॅल्टी शेअर्समध्ये खरेदी सुरू आहे.
 
9 सेशनमध्ये 31 हजार ते 32 हजारपर्यंतची झेप
- गुरुवारी सेन्सेक्सने 91 अंकांच्या वाढीसह 31,896 अंकांवर ओपन झाला. तर निफ्टी 40 अंकांच्या तेजीसह 9,856वर ओपन झाला.
- ट्रेडिंगदरम्यान चहुबाजूंनी झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने नवा विक्रम बनवला. केवळ 9 सेशन्सदरम्यान सेन्सेक्स 31000च्या पातळीहून 32000च्या पातळीवर पोहोचला.
 
हे आहे मार्केटमधील तेजीचे कारण...
- जूनमध्ये रिटेल महागाईचा दर घटून साडेचार वर्षांच्या नीचांकी स्तरावर  1.54% वर आला. हा स्तर नवे आधार वर्ष 2012च्या तुलनेत महागाईचा सर्वात नीचांकी स्तर आहे. रिटेल महागाईत झालेल्या घटीमुळे आरबीआयवर व्याजदरांत कपात करण्याचा दबाव वाढला आहे.
- फेड चेअरपर्सन जेनट येलेन यांनी दरांमध्ये हळुवार वाढीचे संकेत दिले आहेत. जेनट येलेननुसार, अमेरिका फेड दरांमध्ये हळुवार वाढ करेल आणि मॉनिटरी पॉलिसी आणखी कडक करण्याची घाई नाही. या बातमीमुळे बुधवारी अमेरिकी बाजार वाढीसह बंद झाले होते.
- अमेरिकी बाजारांत मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे गुरुवारी एशियाई बाजारांत तेजी आली, याचा परिणाम भारतीय स्टॉक मार्केटवर दिसला.
- डोमेस्टिक स्टॉक मार्केटमध्ये परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. जानेवारी 2017 पासून आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमध्ये 1.50 लाख कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...