Home | Business | Share Market | Sensex Hits 33500 Mark on wednesday

सेन्सेक्सने प्रथमच ओलांडली 33500 ची पातळी, निफ्टीही 10400 च्या नव्या उंचीवर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 01, 2017, 11:31 AM IST

तेजीमुळे ईड ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये 30 अंकानी सुधारणा झाली होती, तसेच एशियन मार्केटमधूनही सकारात्मक संकेत मिळाल्

 • Sensex Hits 33500 Mark on wednesday
  नवी दिल्ली - शेअर बाजारात बुधवारी आणखी एक नवा विक्रम पाहायला मिळाला. सेन्सेक्स 33560.11 च्या पातळीपर्यंत पोहोचला तर निफ्टी 10428.80 च्या पातळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी सोमवारी सेन्सेक्स 33340.17 आणि निफ्टी 10384.50 च्या पातळीपर्यंत पोहोचला होता. या तेजीमुळे ईड ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये 30 अंकानी सुधारणा झाली होती, तसेच एशियन मार्केटमधूनही सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

  यापूर्वीच्या 4 उच्चांकी पातळी...
  25 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33117.33, निफ्टी 10340.55
  26 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33196.17, निफ्टी 10355.65
  27 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33286.51, निफ्टी 10.366.15
  30 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33340.17, निफ्टी 10384.50
  मंगळवारी पाहायला मिळाली होती घसरण
  - शेयर मार्केटमध्ये 25 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबरपर्यंत रोजन निर्देशांक उच्चांकी पाचळीपर्यंत पोहोचला होता. पण मंगळवारी यात घसरण पाहायला मिळाली.
  - मंगळवारी सेन्सेस्क 3325.15 तर निफ्टी 10367.70 वर पोहोचला होता.

  मार्केटमध्ये तेजीचे कारण...
  - इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये भारताची रँकिंग 30 अंकानी सुधारली आहे. याबाबतीत भारताला जगात 100 वा क्रमांक मिळाला आहे. गेल्यावर्षी भारताचे रँकिंग 130 होते. या बातमीमुळे बाजारात सकारात्मक संकेत मिळाले.
  - मंगळवारी अमेरिकेचे शेअर मार्केट तेजी नोंदवत बंद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बुधवारी बाजारात तेजी पाहायला मिळाली.
  - आशियाई बाजारांमध्ये तेजीसह व्यवसायाने स्टॉक मार्केटची तेजीने सुरुवात झाली होती.

 • Sensex Hits 33500 Mark on wednesday
  बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचे पाहायला मिळाले. डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी वाढून रुपया 64.70 च्या पातळीवर पोहोचला होता. 

Trending