बाजारात तेजी सुरूच, ऑटो क्षेत्रात खरेदी; सेन्सेक्स 258, तर निफ्टीत 84 अंकांची तेजी
वृत्तसंस्था | Update - Jan 25, 2017, 03:00 AM IST
आठवड्यातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स २५८ अंकांच्या तेजीसह २७,३७६ च्या पातळीवर बंद झाला
-
मुंबई - आठवड्यातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स २५८ अंकांच्या तेजीसह २७,३७६ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ८४ अंकांच्या वाढीसह ८४७६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान ऑटो आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी ५० मध्ये समावेश असलेल्या ५१ स्टॉक्सपैकी ४४ स्टॉक्समध्ये तेजी, तर सात स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. त्यामुळे या आठवड्यात बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवण्यात आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या पदग्रहण सोहळ्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या मनात असलेली भीती आता कमी झाल्याचे दिसत आहे.