आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाच्या किमतीत तेजी आल्याने बाजारातील घसरणीला ब्रेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १६० अंकाच्या वाढीसह २५,२६२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी २९ अंकाच्या वाढीसह ७,७३५ च्या पातळीवर बंद झाला. तेलाच्या किमतीत तेजी आल्याने जागतिक बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही वाढ नोंदवण्यात आली. युरोपीय बाजारातील तेजीमुळेदेखील भारतीय बाजारात आधार मिळाला. एफएमसीजी क्षेत्रात १.४ टक्के, आयटी क्षेत्रात २ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...